हसवणूक हसायला कारण लागत नाही. तसं तर आपल्याला हसवायला विनोदी साहित्य, इडियट बॉक्सवरचे कॉमेडी शोज कायमच तय्यार असतात. पण आपण केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे जेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, त्याचं समाधान वेगळंच असतं. हसत राहिल्याने शरीर आणि मनात उत्साहाचा संचार होतो. मनापासून हसणे तर एखाद्या औषधाप्रमाणेच आहे. हे एका उत्तम टॉनिकचे काम करते.